भिवंडीत मुस्लीम समाजानं बंद पुकारला, बंदला MIM Congress NCP चा पाठिंबा

Continues below advertisement

भिवंडीत कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातल्या बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. भिवंडीतल्या बंदला एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षानं पाठिंबा दिलाय. मात्र शहरातील प्रभुआळी मंडई, बाजारपेठ या भागात दुकान बंद न झाल्याने एका मोटारसायकलवर आलेल्या टोळीने व्यापाऱ्यांची जबरदस्ती दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे व्यापाऱ्यांनी विरोध करून पोलिसांना माहिती देताच या टोळीने घटनास्थळावरून पळ काढला.दरम्यान शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून भिवंडी शहरातील चौका चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram