Shravan Rathod : संगीतकार श्रवण राठोड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू,कोरोनाचीही झाली होती लागण
मुंबई : नदीम-श्रवण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. श्रवण राठोड यांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज रात्री 10.15 च्या सुमारास त्याचे निधन झाले. श्रवण राठोड यांचा मुलगा संजीव राठोड यांनी एबीपी न्यूजशी बोलताना म्हणाले, "काही वेळापूर्वीच बाबा आम्हाला सोडून गेले आहेत. हार्ट अटॅकने त्यांचे निधन झाले आहे".