Murji Patel on Andheri By election : पक्षाने सांगितलं तर माघार घेणार : मुरजी पटेल : ABP Majha
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.. असं असताना भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी सूचक विधान केलंय..
मी पक्षादेश पाळणार असून, पक्षाने सांगितलं तर निवडणुकीत माघार घेईल, अशी माहिती भाजपच्या मुरजी पटेल यांनी अंधेरी पोटनिवडणुकी संदर्भात दिलीय. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत.