Man Hole BMC :उघड्या मॅनहोलमध्ये पडून कोणाचा मृत्यू झाल्यास पालिका अधिकारी जबाबदार- हायकोर्ट

Continues below advertisement

भविष्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून कोणाचा मृत्यू झाला, किंवा कोणी गंभीर जखमी झाल्यास त्या दुर्घटनेसाठी मुंबई महापालिकेचे अधिकारी जबाबदार असतील असा थेट इशारा मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. तसंच रस्त्यांवरील धोकादायक मॅनहोलच्या प्रश्नावर जाणकारांच्या मदतीनं कायमस्वरूपी तोडगा काढा, असे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयानं बुधवारी मुंबई महापालिकेला दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी 19 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मुलुंड ते घाटकोपर या पट्ट्यात पूर्व द्रुतगती महामार्गाच्या जोड रस्त्यावरच्या दोन्ही बाजूंना तीनशेहून अधिक उघडी मॅनहोल्स आहेत, याकडे याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाचं लक्ष वेधलं. त्याबाबत खंडपीठानं मुंबई महापालिकेकडे विचारणा केली असता याचिकाकर्त्यांच्या दाव्यांची शहानिशा करण्यात येईल आणि उघडी मॅनहोल बंद करून सुरक्षित करण्यात येतील, असं आश्वासन मुंबई महापालिकेनं उच्च न्यायालयाला दिलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram