Mumbra : मुंब्य्रात हिंदी भाषिक फळविक्रेता आणि तरुणांमध्ये वाद चिघळला, मराठी तरुणाविरोधात तक्रार
Mumbra : मुंब्य्रात हिंदी भाषिक फळविक्रेता आणि तरुणांमध्ये वाद चिघळला, मराठी तरुणाविरोधात तक्रार
मुंब्य्रात भर रस्त्यात मराठी विरुद्ध हिंदी भाषिक असा वाद रंगल्याचं पाहायला मिळाला. हिंदी भाषिक फळविक्रेता आणि मराठी तरुणामध्ये हा वाद झाला. फळ विकत घेण्यासाठी आलेल्या मराठी तरुणाने फळविक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितलं. त्यावर आपल्याला मराठी येत नाही, आपण हिंदीत बोलणार असं फळविक्रेता बोलला. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे अशी भूमिका मराठी तरुणानं घेतली. त्यानंतर त्या दोघांमधला वाद एवढा वाढला की स्थानिकांना त्यात मध्यस्थी करावी लागली. तरीही हिंदी भाषिक फळविक्रेता आणि मराठी तरुणामधला वाद काही थांबला नाही. अखेर वाद घालून विनाकारण गर्दी जमवल्याप्रकरणी पोलीस स्थानकात तरुणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.