Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना मोठा दिलासा, CBIकडून क्लोजर रिपोर्ट सादर

Continues below advertisement

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सीबीआयकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पांडे यांच्या कंपनीविरोधात सीबीआयनं केस दाखल केली होती. या केसचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयनं विशेष कोर्टासमोर सादर केला आहे. याची पुढची सुनावणी १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. पांडे यांच्या आयसेक कंपनीविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला होता. आयसेकनं ऑडिट केलेल्या २ स्टॉकब्रोकर्सचं ऑडिट केलं होतं. या ऑडिटमध्ये अनेक गैरप्रकार आढळल्याचा आरोप सीबीआयनं केला होता. मात्र पुरेसे पुरावे न सापडल्यानं आता सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. केोर्ट हा रिपोर्ट स्वीकारतं की नाकारतं ते १४ तारखेच्या सुनावणीत कळणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram