Vaccine:मुंबईकरांची कोरोना लशीच्या दुसऱ्या डोसकडे पाठ? 3लाख लोकंनी दुसरा डोस घेतला नसल्याचं आलं समोर
Continues below advertisement
तुम्ही कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नसेल तर लवकरच मुंबई महापालिकेकडून तुम्हाला फोन येऊ शकतो. यावेळी दुसरा डोस न घेण्याचं कारणही तुम्हाला विचारलं जाणार आहे. कारण मुदत संपल्यानंतरही जवळपास तीन लाख मुंबईकरांनी कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नसल्याचं समोर आलंय. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका कोरोना काळातील 24 वॉर्ड स्तरीय वॉर रुम्सचा वापर करणार आहे. या माध्यमातून मुंबईतील लसीकरण मोहीम प्रक्रिया पुढील दहा दिवसांत सुरळीत करण्याचा पालिकेचा प्रयत्न असेल. मुंबईत जवळपास पाचशे लसीकरण केंद्रांवर 1.47 कोटी नागरिकांचं लसीकरण झालंय. यांत 92 लाख नागरिकांनी पहिला डोस तर 56 लाख नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
Continues below advertisement