ABP News

Mumbai Air Pollution : दक्षिण मुंबईची हवा दिल्लीपेक्षा 'विषारी'; प्रदूषण वाढलं ABP Majha

Continues below advertisement

सध्या राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमधल्या प्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजतोय.. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलंय. मात्र काल, म्हणजे सोमवारी दक्षिण मुंबईतली हवा दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषित होती.. समुद्रावरुन वाहणारे वारे, वाऱ्याचा मंदावलेला वेग आणि वाहनांमुळं वाढलेलं प्रदूषण... या सगळ्यांचा विपरित परिणाम दक्षिण मुंबईतल्या हवेवर झाला. काल  दक्षिण मुंबईतल्या वायू प्रदूषणाचा निर्देशांक ३४५ अंकावर जाऊन पोहोचला होता... तर काल दिल्लीतल्या प्रदूषणाचा निर्देशांक ३३१ अंक इतका होता...  तेव्हा मुंबईची दिल्ली होऊ नये याची जबाबदारी आपल्या सर्वांना घ्यायची आहे.. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram