VIDEO | मुंबई समुद्रात बुडण्याचा कुठलाही धोका नाही,भारतीय शास्त्रज्ञांचा अहवाल | ABP Majha

Continues below advertisement
मुंबई समुद्रात बुडण्याचा कुठलाही धोका नसल्याचा निर्वाळा आता केंद्र सरकारनं राज्यसभेत दिलाय. भारतीय शास्त्रज्ञांनी सादर केलेली माहिती जगातील सर्वोत्तम आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवा असं आवाहनही सरकारनं केलंय. काँग्रेस आणि सपाच्या खासदारांनी यासंदर्भातील प्रश्नांची मालिका राज्यसभेत मांडली.. त्याला उत्तर देताना भूविज्ञानमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. २०४० ते २०५० या काळात वर्षातून किमान एकदा तरी दक्षिण मुंबई समुद्रात बुडेल, असं एका आंतरराष्ट्रीय अहवालात म्हटलं गेलंय. परंतु, आपल्याकडे झालेला अभ्यास आणि माहितीनुसार असं काही होण्याची शक्यता नाही,' असे स्पष्टीकरण डॉ. वर्धन यांनी दिले. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram