Mumbai Weather | मुंबईवर दाट धुक्याची चादर; तापमानही घसरले

Continues below advertisement

पहाटे पडत असलेल्या दाट धुक्यांमुळं मुंबईसह राज्यात थंडीचं आगमन झाल्याचं चित्र आहे. या थंडीची आतुरतेनं वाट पाहत असलेले लोक यामुळे सुखावले आहेत. मुंबई मध्ये गेले दोन दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर आज पहाटे पासून मुंबईवर दाट धुक्याची चादर दिसून येत आहे. मुंबईचा पारा देखील खाली आला असून मुंबईकर गुलाबी थंडीचा आनंद घेत असल्याचं सर्वत्र चित्र आहे.

गेले दोन दिवस मुंबईचे वातावरण ढगाळ होते. मात्र काल रात्री पासून दक्षिण मुंबई, मुंबई उपनगरात मोठ्या प्रमाणत धुकं पसरलेलं आहे. या दाट धुक्यांमुळे पहाटेपासून रस्त्यांवरचं काहीच दिसत नाही. त्यामुळे चालकांना वाहने देखील सावकाश चालवावी लागत आहे. पवईच्या तलावावरदेखील अशीच धुक्याची चादर दिसून येत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram