Mumbai Rains : मुंबईकरांनो पाणी उकळून प्या! भांडुप पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्तीचं काम सुरुच

मुंबईकरांना पाणी जपून वापरायचंच आहे, त्याचबरोबर उकळून प्यावं लागणार आहे. कारण भांडुप जलशुुद्धीकरण संकुलातील यंत्रणा अजूनही पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही. त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम अजूनही सुरुच आहे. त्यामुळे मुंबईत आजही कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे.  शनिवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळं भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात पाणी शिरलं होतं. त्यामळं जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणा बंद करावी लागली होती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola