Dombivali : मुंबईलगतच्या डोंबिवलीत पाणीटंचाई जीवावर बेतली ABP Majha

Continues below advertisement

मुंबईलगतच्या डोंबिवलीत पाणीटंचाई जीवावर बेतल्याची घटना घडलीय. डोंबिवली जवळच असलेल्या संदप गावात खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून  मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल संध्याकाळी घडली. संदप गावासह आसपासच्या देसले पाडा ,भोपर आदी परिसरात पाणी टंचाई आहे. त्यामुळे या भागातील नागरिक संदप गावातील खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी येत असतात. काल संध्याकाळच्या सुमारास देसले पाडा इथल्या गायकवाड  कुटुंबातील दोन महिला व तीन मुले या खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आले. त्यावेळी ही दुर्दैवी  घडली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram