Mumbai Water cut : मुंबई शहराच्या काही भागात 24 तासांसाठी पाणीकपात ABP Majha
Continues below advertisement
मुंबई शहरातील काही भागांमध्ये आज सकाळी १० वाजल्यापासून उद्या सकाळी १० वाजेपर्यंत पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाक़डून जलवाहिन्यांच्या मायक्रोटनेलिंगचे काम हाती घेतले जाणार आहेत. या कामामुळे मुंबईतील, L N, M पश्चिम, F उत्तर आणि F दक्षिण विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहेत. तर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलंय.
Continues below advertisement