Mumbai : मुंबईकरांचं वीज, पाणी महागलं ; 7.12 टक्के दरवाढीला प्रशासकाची मंजुरी
Continues below advertisement
वीज आणि पाण्यासाठी मुंबईकरांचा खिसा आता थोडा जास्त रिकामा होणार. मुंबईकरांच्या वीजबिलात आणि पाणीबिलात वाढ होणार आहे. कोरोनाच्या संकटांत मुंबईकरांच्या पाणीपट्टीतली वाढ दोन वर्षांपासून मुंबई महापालिकेनं रोखून धरली होती. पण 2022-2023 या वर्षासाठी पाणीपट्टीत 7.12 टक्क्यांनी वाढ करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी मंजुरी दिली आहे. ही दरवाढ जूनपासून लागू करण्यात येणार आहे. त्याचवेळी सुरक्षा अनामतीच्या नावाखाली ग्राहकांनी दोन महिन्यांच्या बिलांची रक्कम आगाऊ स्वरुपात भरावी असं फर्मान 'बेस्ट' प्रशासनानं काढलं आहे. त्यामुळं लाखो सर्वसामान्य वीज ग्राहकांचं 'बजेट' कोलमडणार आहे. हा निर्णय रद्द करण्याची मागणी वीज ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
Continues below advertisement