Maratha Reservation | मराठा क्रांती मोर्चाची आज मुंबईत बैठक, विनायक मेटे यांच्याकडून बैठकीचं आयोजन
मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबईतील वडाळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आज राज्यस्तरिय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. विनायक मेटे यांच्याकडून या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र या बैठकीसाठी उदयनराजे उपस्थित राहणार का, याकडे सर्व मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे.