Vegetable Price Hike | भाज्या 4 ते 5 पटीने महागल्या, महागाई आटोक्यात असल्याचा सरकारचा दावा किती खरा?
महंगाई डायन खाये जात है, हेच गाणं म्हणायची वेळ आता गरिबांवर आली आहे. कारण देखील तेच आहे. सरकारने कितीही दावे केले की महागाई आटोक्यात आहे, तरी वास्तव काही वेगळंच आहे. या महागाईत सर्वसामान्य मरायला टेकला आहे. कांदा, बटाटा, तेल, राई, जिरे, पालेभाज्या, फळभाज्या, फळे या सर्वांची किंमत 4 ते 5 पट महाग झाली आहे आणि त्यावर सरकारचे काहीही नियंत्रण नाही. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबियांना आता जगावे की मरावे असा प्रश्न पडला आहे.