Mumbai Vaccination Drive : तीन दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईत आज पुन्हा लसीकरणाला सुरुवात

तीन दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईत आज लसीकरण सुरु होतंय. आणि यंदाच्या खेपेला तरी आपल्याला डोस मिळावा म्हणून मुंबईकरांनी पहाटे पाचपासूनच रांग लावली आहे. मुंबईतल्या महत्त्वाच्या केंद्रापैकी एक म्हणजेच नेस्को लसीकरण केंद्राबाहेर भलीमोठी रांग पाहायला मिळतेय. दरम्यान आजपासून सुरु होणारं लसीकरण आणखी किती दिवस सुरळीत सुरु राहील असा प्रश्न आहे.. कारण मिळालेल्या माहितीनुसार सध्या मुंबईकडे 1 लाख 35हजार लशींचा साठा आहे. मागणी पाहता हे डोस दोन दिवसच पुरण्याची शक्यता आहे.  त्यामुळं येत्या दोन दिवसांत आणखी डोस मिळाले नाही तर लसीकरणाला पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola