WEB EXCLUSIVE : मुंबईतील मैदानं, चौपाट्या सकाळी 6 ते रात्री 10 पर्यत सुरु राहणार ABP Majha
ब्रेक द चेन अंतर्गत मुंबईत आजपासून सकाळी 6 ते रात्री 10 पर्यत खेळाची मैदाने, बागा, समुद्रकिनारे, चौपट्या खुल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे आता नागरिकांमध्ये समाधान पाहिला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मैदाने, गार्डन्स, समुद्रकिनारी जाण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र आजपासून ही बंदी उठवण्यात आली आहे. याबाबतचा अध्यादेश नुकताच मुंबई महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.