Mumbai University Sinet Election : सिनेट निवडणुकीत ठाकरेंविरोध भाजप, शिंदे गट, मनसे एकत्र येणार?
Mumbai University Sinet Election : सिनेट निवडणुकीत ठाकरेंविरोध भाजप, शिंदे गट, मनसे एकत्र येणार?
सत्तेची दोरी ज्यांच्या हातात आहे, ते महापालिकेतल्या प्रभागरचनांची पुनर्रचना करणारच. तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नवी उमेद जागवली. शिवसेनेतलं ऐतिहासिक बंड आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.
राज्य सरकारच्या नगरविकास खात्यानं विविध महापालिकांमधल्या प्रभागांची पुनर्रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं राज्यातल्या महापालिका निवडणुका लवकरच होण्याची चिन्हं आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी विभागवार बैठका घेण्यात येत आहेत.
ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते प्रभागांची पुनर्रचना करणारच, असं सांगून उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना म्हणाले की, आपण जिंकण्यासाठी मैदानात उतरुया. मुंबई महापालिका आपल्याकडेच कायम राहणार आहे. मुंबई महापालिका आणि मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचेही आदेश त्यांनी दिले.