Mumbai university : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका जाहीर, 12 जुलै रोजी मतदान पार पडणार
सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम अखेर मुंबई विद्यापीठाने जाहीर केला आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील शिक्षक, प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, विभागप्रमुख आणि विद्याशाखेवरील प्राध्यापकांमध्ये निवडणूक रंगणार आहे. याकरिता उमेदवारांना ७ जूनपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे..१२ जुलै रोजी मतदान पार पडणार असून १४ जुलैला याची मतमोजणी करण्यात येणार आहे.