Senate Election Program : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडण्याची शक्यता
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान नव्याने मतदार नोंदणी करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठानं घेतला आहे. आणि याविरोधात याचिकाकर्त्यांकडून मुंबई हायकोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. सिनेट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात मुंबई विद्यापीठाचा वेळकाढूपणा सुरू आहे, असा आरोप याचिकाकर्ते करत आहेत. राजकीय दबावापोटी मुंबई विद्यापीठ अशाप्रकारे निर्णय घेत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
Tags :
Bombay High Court Decision University Of Mumbai Bombay High Court Intervention Petition Voter Registration Senate Election Schedule Timeliness