University of Mumbai: मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक स्थिगिती प्रकरण,17 ऑगस्ट रोजी सिनेट निवडणूक रद्द
मुंबई विद्यापीठाची जाहीर झालेली सिनेट निवडणुक स्थगित करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते अॅड सागर देवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. मुंबई विद्यापीठाची कृती बेकायदेशीर असा युक्तिवाद देवरे यांनी केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या पदवीधरांमधून निवडून येणाऱ्या १० जागांसाठीची निवडणूक ९ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली होती. मात्र आठच दिवसांनी म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी ही निवडणूक रद्द करण्यात आली