Mumbai : जुहू गल्लीत 4 मजली अनधिकृत बांधकाम कोसळलं, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 5 जणांना वाचवण्यात यश
मुंबईत मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अंधेरी पश्चिमेकडे असलेल्या जुहू गल्ली परिसरातील झोपडपट्टीत एक अनाधिकृत 4 मजली बांधकाम कोसळलंय. हे बांधकाम आजूबाजूच्या४ घरांवर कोसळल्यानं ढिगाऱ्याखाली ५ जण अडकले होते. मात्र मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत वेगानं बचावकार्य राबवलं आणि या ५ जणांचे प्राण वाचवले आहेत. या 5 जखमींना जवळच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या हा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात अशी अनधिकृत बांधकामं असल्यानं परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे.