Mumbai Trans Harbour Link Toll Price : ठरलं! शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर 250 रुपयांचा टोल

Continues below advertisement

Mumbai Trans Harbour Link Toll :  शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू (Mumbai Shivadi Nhava Sheva Mumbai Trans Harbour Link) 12 जानेवारीपासून सेवेत आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या सागरी सेतूचे  उद्घाटन करण्यात येणार आहे. या सागरी सेतूवर वाहनांना किती टोल असणार, याकडे वाहनचालकांचे लक्ष होते. अखेर या सागरी सेतूवरील टोल रक्कम निश्चित करण्यात आली आहे. शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर 500 रुपयांचा टोल असणार असल्याची चर्चा होती. मात्र, या सागरी सेतूवर 250 रुपयांचा टोल असणार आहे.  आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळली आहे. मुंबई ते अलिबाग हे अंतर या  सागरी महामार्गामुळे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. पर्यावरणपूरक असा हा सागरी महामार्ग असून बांधकामातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून त्याचे काम करण्यात आले आहे.  ओपन रोड टोलिंग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग ठरणार असल्याचेही सांगण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram