Mumbai Local Masjid Bander : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशाचा बळी, मुंबई लोकल प्रवाशी संघटना आक्रमक

Continues below advertisement
मुंबईत सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने (CRMS) पुकारलेल्या अचानक संपाने रेल्वे सेवेचा बोजवारा उडाला, ज्यामुळे एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला. 'आमच्या पैशावर तुमचा पगार होतोय आणि तुम्ही आम्हालाच मारायला टपला आहात,' असा संतप्त सवाल रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव सिद्धेश देसाई यांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मुंब्रा रेल्वे दुर्घटनेप्रकरणी दोन रेल्वे अभियंत्यांवर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला होता. या संपामुळे CSMT, ठाणे, दादर आणि कुर्ला स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. याच गर्दीचा फटका बसून CSMT ते मस्जिद बंदर दरम्यान एका प्रवाशाचा लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. रेल्वे प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असले, तरी प्रवाशांचे हाल सुरूच होते. प्रवासी संघटनांनी या प्रकाराला पूर्णपणे चुकीचे ठरवत, प्रवाशांना वेठीस धरल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola