Seat Belt Fine Mumbai : चार दिवसांत 12 हजार प्रवाशांवर कारवाई, सीटबेल्ट सक्तीची अंमलबजावणी सुरु
वाहतूक पोलिसांकडून मुंबईत सीटबेल्ट सक्तीची अंमलबजावणीसुरु केलीय. 15 नोव्हेंबरपासून चार दिवसांत मुंबईत कारमध्ये सीटबेल्ट न लावणाऱ्या 12 हजारपेक्षा अधिक प्रवाशांवर कारवाई करण्यात आलीय. दोनवेळा मुदतवाढ दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई सुरू केलीय. त्यामुळे मुंबईत यापुढे चारचाकी वाहनातून प्रवास करताना मागच्या सीटवरील प्रवाशांनाही सीटबेल्ट लावावा लागणार आहे.