Mumbai Traffic | CSMT आंदोलनामुळे मुंबईकरांची प्रचंड कोंडी, नोकरदारांना मोठा त्रास!
मुंबईतील CSMT स्थानकावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरील अत्यंत महत्त्वाचे असलेल्या CSMT स्थानक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईतील नोकरदार वर्गासाठी हे स्थानक अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण रोज लाखो मुंबईकर येथून प्रवास करून आपली कार्यालये गाठतात. घड्याळाच्या काट्यावर धावणारे हे मुंबईकर पण त्या सगळ्यांची या आंदोलनामुळे कमालीची कोंडी झालेली आहे. या आंदोलनामुळे मुंबईकरांची दैनंदिन जीवनाची गती थांबली आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा फटका बसला असून, त्यांना वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे. मिकी घई CSMT स्थानकावरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.