Mumbai Planning Authority : मुंबईच्या विकासासाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमणार : Aditya Thackeray
मुंबईच्या विकासासाठी एकच नियोजन प्राधिकरण स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलीय. मुंबईच्या विकासासाठी वेगवेगळ्या १६ यंत्रणा कार्यरत आहेत. त्या ४२ प्रकारची कामं हाताळतात. त्यामुळे मुंबई शहराला एकाच स्वतंत्र नियोजन प्राधिकरणाची गरज आहे. त्यामुळे महापौरांच्या नेतृत्वाखाली एकच नियोजन प्राधिकरण स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. पर्यावरण आणि हवामानावर आधारित क्लायमेट क्रायसिस २.० या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते सहभागी झाले होते. मुंबईत सीईओ नेमण्याऐवजी महापौरांना अधिक अधिकार देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं.