Mumbai Tipu Sultan Ground: टिपू सुलतान नाव आणि मुंबईतील वाद ABP Majha
Continues below advertisement
मुंबईच्या मालाड मधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून राजकारण चांगलंच तापलंय. कारण उद्धाटनाआधी या परिसरात भाजप, बजरंग दलाने टिपू सुलतान मैदानाच्या नामकरणाला विरोध करत तीव्र आंदोलन केलं. घटनास्थळी पोलीस देखील मोठ्या प्रमाणात पोहोचले होते, यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तर या सर्व वादातच पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या मैदानाचं उद्घाटन करण्यात आलं. मालाडमधलं हे मैदान अनेक दिवसांपासून दुरवस्थेत होतं..२ कोटी ५५ लाख रुपये खर्चून या मैदानात नव्या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत...नूतनीकरण केलेल्या या मैदानाला टिपू सुलतान हे नाव देण्याचा निर्णय मंत्री अस्लम शेख यांनी घेतला होता. भाजपनं यावर आक्षेप घेतलाय.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Shiv Sena BJP Maharashtra Government Bmc Malad Vishwa Hindu Parishad Aslam Shaikh Bajrang Dal BJP Tipu Sultan Tipu Sultan Ground Controversy BJP