ABP News

Mumbai : जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांची बैठक, हॉटेल ट्रायडंट येथे बैठक पार पडली : ABP Majha

Continues below advertisement

महाराष्ट्राच्या पायाभूत विकास प्रकल्पांसाठी जागतिक बँकेने सहकार्य करावं, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीये. दुष्काळमुक्त महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सुरू असलेल्या नदीजोड प्रकल्पाला अर्थसाह्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल आहे. आज जागतिक बँकेच्या संचालक मंडळाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनोज सौनिक यांची भेट घेतली. यापूर्वीही जागतिक बँकेने राज्यात अनेक मोठे प्रकल्प उभारलेत. भविष्यातही प्रकल्प उभारले जातील. पण केवळ पायाभूत सुविधांसाठी नव्हे, तर इतरही क्षेत्रांत संस्थात्मक क्षमता बांधणीसाठी जागतिक बँकेने सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणालेत. जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांसमवेत हॉटेल ट्रायडंट येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram