Mumbai : रुग्णवाढीचा वेग मंदावला,उपचाराधीन रुग्णांची संख्या, Oxygen ची मागणी वाढली

Coronavirus Updates : मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातील काही जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता, त्याच्या परिणाम राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढली असल्याचे समोर येत आहे. राज्यात सध्या दररोज 424 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे. हीच मागणी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत  दिवसाला 270 ते 300 मेट्रिक टनची आवश्यकता होती. ऑक्सिजनची मागणी वाढली असली तरी राज्यात पुरेसा साठा असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola