Mumbai : कोरोनाची सौम्य लक्षणं असतील तरी चाचणी करा, मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांचं आवाहन
Continues below advertisement
BMC Commissioner : कोरोनाची सौम्य लक्षणं असतील तर चाचणी करून घेण्यात टाळाटाळ करू नका. कारण अशा बेफिकीरीमुळे कोरोनाचं संकट आणखी वाढू शकतं. मुंबईत कोरोना रुग्णवाढ काहीशी स्थिरावलेली दिसत असली तरी चाचणी करण्यात टाळाटाळ, सेल्फ टेस्टची प्रशासनाकडे नोंद होणं आणि लॅबवरील ताण या कारणांमुळे हे चित्र असू शकतं. प्रत्यक्षात ओमायक्रॉनच्या लाटेचा धोका अजूनही कायम आहे आणि सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून टेस्टही करा आणि लस घेतली नसेल तर लसही घ्या, असं आवाहन महापालिका आयुक्त चहल यांनी केलंय.
Continues below advertisement