Mumbai Temperature Rises : मुंबईत तापमान वाढलं, पारा 39 ते 40 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज ABP Majha
Continues below advertisement
पूर्वेकडून आलेल्या उष्ण वाऱ्यांनी मुंबईला तीव्र चटके देण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी तापमानाची कमाल आणि किमान पातळी सरासरीपेक्षा थेट तीन ते चार अंशांनी वाढली. मुंबीत सोमवारी कमाल तापमान 37, तर किमान तापमान 26 अंशांवर गेलं होतं. त्यामुळे मुंबईकरांची दुपारी उन्हातून चालताना प्रचंड दमछाक झाली. आज आणि उद्या तर पारा 39 ते 40 पर्यंत पोहोचेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ठाणे, रायगड, पालघर या जिह्यांनाही उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement