Mumbai Temperature :मुंबईह बहुतांश शहरांचं तापमान 35 अंशांच्या पार, ठाणे, नवी मुंबईतही वातावरण तापलं

Continues below advertisement

Mumbai Temperature :मुंबईह बहुतांश शहरांचं तापमान 35 अंशांच्या पार, ठाणे, नवी मुंबईतही वातावरण तापलं
मार्च महिन्याच्या अखेरीस उन्हाळा चांगलाच जाणवू लागला आहे. मुंबईसह लगतच्या बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ३५ अंशावर जाऊन ठेपले आहे. ठाणे, नवी मुंबईही तापमान ३६ ते ३८ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, यात भर म्हणून पुढील दोन दिवस कोकण आणखी तापणार आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात २ ते ३ अंशानी वाढ होईल. तर २६ ते २७ मार्च दरम्यान कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहील. मुंबईत सध्या आर्द्रता ४५ टक्के इतकी आहे. त्यामुळे फारसा घाम येत नाहीये. मात्र एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईची आर्द्रता ७५ टक्क्यांच्या आसपास असेल, आणि तेव्हा तापमान ३४च्या आसपास असलं तरी ते ३८ अशांसारखं जाणवेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागा वर्तवला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram