Mumbai Tardeo : ताडदेव येथे राहणाऱ्या वृध्द महिलेचा जीव घेऊन आरोपी फरार
Mumbai Tardeo : ताडदेव येथे राहणाऱ्या वृध्द महिलेचा जीव घेऊन आरोपी फरार ताडदेव मेन रोडवरील युसुफ मंझिलमध्ये राहणाऱ्या वृध्द पती पत्नीच्या घरात शिरून त्यांना बांधून ठेवण्यात आले. चिकटपट्टी, कापसाच्या बोळे कोंबण्यात आल्याने ७० वर्षीय महिलेचा श्वास कोंडल्याने मृत्यू झाला. चार ते पाच जणांनी घरात घूसून दागिन्यांची चोरी केली आणि पसार झाले. मदन हे सकाळी सहाच्या सुमारास माॅर्निंग वाॅकसाठी घराबाहेर पडत असतानाच चार ते पाचजण आले. त्यांना आतमध्ये ढकलले आणि पती पत्नीला दोरी आणि सॅलोटेपच्या साहाय्याने बांधून ठेवले.