Mumbai Superfats News : मुंबईतील सुपरफास्ट बातम्या : 30 Sep 2024

समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात होण्याची शक्यता, मुंबई-नाशिक महामार्गावर आमणे इंटरचेंजजवळ रस्त्याचं काम अपूर्ण, अपूर्ण कामामुळे लोकार्पण लांबणीवर गेल्यांची माहिती.

धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी राज्य सरकारकडूनन भाडेतत्त्वावरील घरे योजना, धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत राज्य सरकारचा निर्णय.

घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनविकासासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. MMRD आणि SRAकडून भागीदारी तत्त्वावरती या झोपडपट्टीचा पुनर्विकास, मात्र 300 नको 500 चौरसफूटाचं घर द्या, रहिवाशांची मागणी. 

ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला राज्य सरकार गती देणार, एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय.

ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास राज्य सरकार गती देणार,  १२ हजार २०० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता.

मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून १५, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय.

ST प्रवर्गातून धनगरांना आरक्षण देण्याचा जीआर मागे घेण्याच्या मागणीसाठी नरहरी झिरवळांचं बेमुदत धरणे आंदोलन, आमचा समाज जगावा म्हणून आंदोलन, झिरवळांची माध्यमांना प्रतिक्रिया. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola