Mumbai : एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होणार की नाही? दोन दिवसांत अहवाल!

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी पुकारलेला संप अजूनही संपलेला नाही.. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये  विलनीकरण करायचं की नाही यासंदर्भातला अहवाल दोन दिवसांत येणार आहे.. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परबांनीच तशी माहिती दिली आहे.. मालेगावमधल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसंदर्भात अहवाल तयार करण्यासाठी त्रिस्तरीय समिती नियुक्त केली आहे. या समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचं अनिल परबांनी स्पष्ट केलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola