Mumbai : जगात पहिल्यांदाच होर्डिंग्सवर लावले सोलर पॅनल

जागतिक विक्रम करण्याची नोंद करण्याचा आणखी एक मान मुंबईला मिळालाय. मुंबई शहरात आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्स पाहायला मिळतात. याच होर्डिंग्सवर सोलार पॅनल लावून पर्यावरणपूरक वीज मिळवण्याचा विश्वविक्रम करण्यात आला आहे. मुंबईमधल्या वाडीबंदर परिसरात ही होर्डिंग्स लावण्यात आली आहेत. त्यावर तब्बल ८४ सोलार पॅनल्स लावण्यात आली असून, त्यातून वर्षाला सात हजार युनिट वीज निर्मिती केली जाणार आहे. त्यातून रेल्वेलाही वीजपुरवठा करण्यात येत आहे. जगात होर्डिंगवर पहिल्यांदाच सोलर पॅनल लावण्याचा हा विक्रम करण्यात आला आहे. त्यात मोलाची भूमिका बजावणारे मुस्तफा अकोलावाला यांनी काय म्हटलंय, तेही आपण पाहूयात.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola