No Lockdown in Mumbai | मुंबईची स्थिती नियंत्रणात, पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही, मनपा आयुक्तांची माहिती | स्पेशल रिपोर्ट

महानगरपालिका आयुक्त  इकबाल सिंह चहल यांच्या माहितीनुसार,  "सर्वात आधी प्रतिबंधित क्षेत्रांचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. त्यानंतर विषाणूचा पाठलाग (चेस द व्हायरस) या धोरणातून बाधित, संशयित रुग्णांचा व्यापक मोहीमेतून शोध घेणे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तिंचे अधिकाधिक संस्थात्मक अलगीकरण करणे, घरोघरी जाऊन व फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून तसेच विशेष शिबिरांतून जास्तीत जास्त चाचण्या करीत रुग्ण वेळीच शोधणे व त्यांच्यावर उपचार करणे, रुग्णालयांसह ठिकठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये पुरेशा व गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा निर्माण करणे, परिणामकारक अशा औषधी साठा उपलब्ध करुन त्या आधारे उपचारांवर भर देणे अशा उपाययोजनांनी कोविड १९ संसर्ग नियंत्रणात आणायला मदत होते आहे." या सर्व उपाययोजना योग्य पद्धतीने आखून त्याची अंमलबजावणी देखील होत असल्याचे आता त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola