Sion Flyover Shut | मुंबईतील सायन उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी पुन्हा बंद
आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून सायन उड्डाण पूल वाहतुकीसाठी पुन्हा एकदा बंद करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत ही वाहतूक बंद असेल. दोन वर्षापूर्वीच्या ऑडीटमध्ये या पुलाचे बेअरिंग बदलणं आवश्यक असल्याचं समोर आलं होतं, त्यानंतर या पुलावरुन अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. तर 14 फेब्रुवारीपासून बेअरिंग बदलण्याच्या कामाला सुरवात झाल्यामुळे दर आठवड्याला गुरुवार ते सोमवार वाहतूक बंद करण्यात येईल.