Mumbai | मुंबई आणि परिसरातील दुकानं, आस्थापनं रात्री 11 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार
मुंबई लोकल सेवा सरसरकट सर्व प्रवाशांसाठी सुरु करण्याच्या निर्यणयासोबतच आता प्रशासनानं मुंबई आणि परिसरात असणाऱ्या दुकान मालकांनाही दिलासा दिला आहे. नव्या निर्णयाअंतर्गत आता मुंबई आणि परिसरातील दुकानं, आस्थापनं रात्री 11 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. यासाठी कर्मचाऱी संख्येचीही मर्यादा ठेवण्यात आली आहे.