Mumbai : शिंदे-फडणवीसांनी घेतली रस्ते, पायाभूत सुविधांबाबतची आढावा बैठक

Continues below advertisement

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात आज महाराष्ट्रातील रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत आढावा बैठक संपन्न झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह राज्य आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्रात सध्या सुमारे दोन लाख कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्यात येतायत. त्यापैकी ८२ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प एकट्या मुंबई क्षेत्रात राबवण्यात येतायत. मुंबई क्षेत्रात १७८ किलोमीटर्स लांबीचे उन्नत मार्ग बनवण्यात येत असून, त्यासाठी २२ हजार ३७८ कोटी रुपयांचं अंदाजपत्रक आखण्यात आलं आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्याकडून प्रत्येकी पाच हजार कोटी रुपये अधिकचा निधी देण्यात येणार आहे. तसंच आगामी काळातील आव्हानं लक्षात घेऊन हे उन्नत मार्ग अधिक लेन्सचे करण्यात येतील. तसंच नजिकच्या काळात मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन सुरु करण्याचाही प्रयत्न आहे. पाहूयात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी या बैठकीनंतर काय सांगितलं?

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram