Wadia Hospital | कुठल्याही परिस्थितीत वाडिया हॉस्पिटल बंद होऊ देणार नाही : शर्मिला ठाकरे | ABP Majha
Continues below advertisement
अख्खं लालबाग परळ जिथं जन्माला आलं ते वाडिया हॉस्पिटल सध्या व्हेंटिलेटरवर आहे. निधीअभावी बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या वाडिया हॉस्पिटलचे कर्मचाऱ्यांनी आंदोलना पवित्रा हातात घेतला आहे. वाडिया हॉस्पिटलबाहेर लाल बावटा जनरल कामगार युनियननं आंदोलन सुरु केलंय. या आंदोलनात चारशे कर्मचारी सहभागी झाले आहेत. मनसेनंही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. कुठल्याही परिस्थितीत वाडिया हॉस्पिटल बंद होऊ देणार नाही अशी भूमिका शर्मिला राज ठाकरे यांनी मांडली. तसेच ‘आमचे हात जोडलेले आहेत ते असेचं जोडलेले राहू द्या’ असा धमकीवजा इशारा शर्मिला राज ठाकरे यांनी दिली. या आंदोलनात राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
Continues below advertisement