Mumbai Sewer Cleaning : पावसात मुंबईची तुंबई होणार? नालेसफाईचा Reality Check!
Continues below advertisement
मुंबईत मान्सून दाखल होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मान्सूनपूर्व तयारी पूर्ण झाल्याचा दावा केलाय. मुंबई तुंबणार नाही, असाही दावा केलाय. या मुंबईच्या नालेसफाईच्या कामांचं वास्तव जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या टीमने नालेसफाईची पाहणी केली. तेव्हा वास्तव आणि दाव्यामध्ये फरक जाणवला. यंदाही मुंबईची तुंबई होणार, अशी परिस्थिती पाहायला मिळतेय. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामासाठी मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केलेत. त्यानंतरही नालेसफाई अर्धवटच झाल्याचं दिसतंय.
Continues below advertisement