Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

Continues below advertisement

Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा  अटक झाल्यापासून शिक्षा होईपर्यंतचा 12 वर्षांचा कारागृहात घावलेला कालावधी शिक्षेतून माफ करण्यास मान्यता  मुंबईतील 1993 सालच्या बॉम्बस्फोटांशी संबंधित प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड अबू सालेमची मागणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष टाडा कोर्टानं मान्य केली  सालेम याला साल 2005 मध्ये पोर्तुगाल सरकारनं भारताच्या हवाली केलं होतं  त्यानंतर, सालेमवर मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी खटला चालवण्यात आला आणि साल 2017 मध्ये विशेष टाडा न्ययालयानं त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली  सध्या तो नवी मुंबईतील तळोजा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे  सालेमनं या प्रकरणातील अटकेच्या तारखेपासून ते त्याला शिक्षा सुनावली जाईपर्यंत म्हणजेच 11 नोव्हेंबर 2005 ते 7 सप्टेंबर 2017 हा तुरूगांत घालवलेला 12 वर्षांचा कालावधी शिक्षेतून कमी करण्याची मागणी कोर्टाकडे केली होती  त्याच्या अर्जावर विशेष टाडा न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी निर्णय देताना त्याची मागणी मान्य केली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram