Mumbai Sea Route : बिपरजॉयमुळे बंद ठेवण्यात आलेली मुंबईची जलसेवा पूर्ववत, मेरिटाईम बोर्डाची माहिती
Continues below advertisement
बिपरजॉयमुळे बंद ठेवण्यात आलेली मुंबईची जलसेवा शनिवारपासून पूर्ववत करण्यात आलीय. उरणमधील मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का ही जलसेवा पुन्हा सुरू केल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. बिपरजॉय चक्रीवादळामुळे ९ जूनपासून ही जलसेवा बंद करण्यात आली होती. आता मुंबईवरील चक्रीवादळाचा धोका टळल्याने शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून ही सेवा पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, या मार्गावरील प्रवासी बोटी एक तासाऐवजी दोन तासांनी करण्यात आल्याचं मेरिटाईम बोर्डानं स्पष्ट केलंय.
Continues below advertisement