Mumbai School Reopen : मुंबईतल्या शाळा 4ऑक्टोबरपासून सुरु होणार, शाळा प्रशासनाकडून तयारी सुरु
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्य सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईतही आता शाळा सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. त्यासाठी शाळेतील प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. या पूर्वतयारीमध्ये शाळा पूर्णतः सॅनिटाईज करणे, शाळेतील बाक आणि वर्गांची साफसफाई करणे, प्रयोगशाळांमध्ये साफसफाई करणे, अशी कामे सुरू करण्यात आली आहेत. यासोबतच शाळा प्रशासनाने पालकांशी सल्लामसलत करून नवीन नवीन उपक्रम हाती घेण्याचे ठरवले आहे. दादर मधील साने गुरुजी विद्यालयात देखील अशीच लगबग आम्हाला बघायला मिळाली. या शाळेने सर्व पालकांशी संपर्क साधून ते मुलांना शाळेत पाठवणार आहेत की नाही यासंदर्भात माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. सोबतच मानसोपचार तज्ञशी बोलून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी जास्तीत जास्त वेळ द्यावा असे सांगण्यात आले आहे. यासंदर्भात शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी....