Mumbai School Bus : स्कूल बसेसना डिझेल मिळेपर्यंत बस रस्त्यावर धावणार - अनिल गर्ग
abp majha web team
Updated at:
03 Jan 2024 12:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन दिवसानंतर वाहतूकदारांनी संप जरी मागे घेतला असला तरी सलग दोन दिवसांच्या संपामुळे राज्यात अनेक भागात इंधनाचा तुटवडा आहे. संपाला पाठिंबा नसला तरी इंधन असेपर्यंत सेवा देणार अशी भूमिका स्कूल बस असोसिशनने घेतली आहे. हिट अँड रन कायद्याविरोधातील आंदोलनाला पाठिंबा नाही किंवा त्यात सहभागी झालेलो नाहीत. स्कूल बसेसना जोपर्यंत डिझेल मिळेल तोपर्यंत बस रस्त्यावर धावतील आणि सेवा देतील, अशी माहिती महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशन अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली आहे. मुंबईत एकूण सहा हजार ते महाराष्ट्रात ४० हजार स्कूल बसेस आहेत. .