Mumbai School: ऑनलाईन शिक्षण बंद करणाऱ्या शाळांवर कारवाई होणार ABP Majha
Continues below advertisement
मुंबईत ऑनलाईन शिक्षण बंद करणाऱ्या शाळांवर कारवाई होणार आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने हा इशारा दिलाय. कोरोनाचा प्रसार कमी होताच मुंबईत पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्यात आल्यात. मात्र शाळा सुरु होताच ऑनलाईन शिक्षण बंद करण्यात आलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत शाळांना कडक सूचना दिल्या जाणार आहेत. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आलंय. तसंच ज्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत पाठवण्यास तयार नसतील त्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे असे आदेश शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिलेेत.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Education Mumbai Municipal Corporation Online Education Warning Department Closure Action On Schools Corona Dissemination