Sanjay Raut | मोहन रावले म्हणजे, शिवसेनेतील धगधगता निखारा : संजय राऊत
Continues below advertisement
शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी मोहन रावले यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहन रावले हे आतापर्यंत दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे 5 वेळा खासदार राहिले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जात असत. सर्वसामान्यांचे नेते आणि लालबाग-परळ ब्रँड अशी मोहन रावले यांची ओळख होती.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोहन रावले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे की, "मोहन रावले गेले. कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्ह्ते. "परळ ब्रँड "शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहीला विनम्र श्रद्धांजली..."
Continues below advertisement